श्री मंगळागौरीची आरती
आकार
मांडणी
जय देवी मंगळागौरी । ओंवाळीन सोनियाताटीं ॥
रत्नांचे दिवे । माणिकांच्या वाती । हिरेया ज्योती ॥ ध्रु ॥
मंगळमूर्ती उपजली कार्या । प्रसन्न झाली अल्पायुषी राया ॥
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया ॥1॥
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा ॥
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे ॥
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली ॥2॥
साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ॥
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ॥3॥
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । कळावी कांकणें गौरीला शोभती ॥
शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । ल्यायिली अंबा शोभे ॥4॥
न्हाउनी माखुनी मौनी बैसली । पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ॥
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ॥5॥
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती । मध्यें उजळती कापुराच्या वाती ॥
करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ॥6॥
लवलाहें तिघें काशीसी निघाली । माउली मंगळागौर भिजवूं विसरली ॥
मागुती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली । ।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ॥7॥
पद 1

पद 2

पद 3
साळीचे तांदुळ मुगाची डाळ । आळणीं खिचडी रांधिती नारी ॥
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ॥3॥
पद 4
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती । कळावी कांकणें गौरीला शोभती ॥
शोभली बाजुबंद । कानीं कापांचे गवे । ल्यायिली अंबा शोभे ॥4॥
पद 5
न्हाउनी माखुनी मौनी बैसली । पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली ॥
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ॥5॥
पद 6
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती । मध्यें उजळती कापुराच्या वाती ॥
करा धूप दीप । आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ॥6॥
पद 7
लवलाहें तिघें काशीसी निघाली । माउली मंगळागौर भिजवूं विसरली ॥
मागुती परतुनीयां आली । अंबा स्वयंभू देखिली । ।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे । कळस वरती मोतियांचा ॥7॥
स्रोत 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS source decoded to Devanagari and round-trip validated against the site transliterator.
अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.