श्री हरितालिकेची आरती
आकार
मांडणी
जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ॥ ध्रु ॥
हरार्धांगीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ॥
तेथें अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ॥1॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥2॥
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ॥
केली बहू उपोषणें । शंभु भ्रतारकारणे ं ॥3॥
लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठीं ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ॥4॥
काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ॥
मातें दाखवीं चरण । चुकवावें जन्म मरण ॥5॥
पद 1
जयदेवी हरितालिके । सखी पार्वती अंबिके ॥
आरती ओवाळीतें । ज्ञानदीपकळिके ॥ ध्रु ॥
हरार्धांगीं वससी । जासी यज्ञा माहेरासि ॥
तेथें अपमान पावसी । यज्ञकुंडींत गुप्त होसी ॥1॥
पद 2
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसी तू गोमटी ॥
उग्र तपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥2॥
पद 3
तापपंचाग्निसाधनें । धूम्रपानें अधोवदनें ॥
केली बहू उपोषणें । शंभु भ्रतारकारणे ं ॥3॥
पद 4
लीला दाखविसी दृष्टी । हें व्रत करिसी लोकांसाठीं ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटीं ॥4॥
पद 5
काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ॥
मातें दाखवीं चरण । चुकवावें जन्म मरण ॥5॥
स्रोत 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS source decoded to Devanagari and round-trip validated against the site transliterator.
अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.