वटसावित्रीची आरती
आकार
मांडणी
अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ॥
आरती वडराजा ॥1॥
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥
भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ॥ ध्रु ॥
ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशीं ॥
त्रिरात्र व्रत करूनीया । जिंकी तूं सत्यवंताशी ।
आरती वडराजा ॥2॥
स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ॥
धर्मराजा उचकला. हत्या घालील जीवाला ।
येई ग पतिव्रते ॥ पती नेई गे आपुला ॥
आरती वडराजा ॥3॥
जाऊनियां यमापाशीं । मागतसे आपुला पती ॥
चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ॥
आरती वडराजा ॥4॥
पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ॥
तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ॥
आरती वडराजा ॥5॥
पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ॥
स्वर्गीं पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती ।
अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ॥6॥
पद 1
अश्वपती पुसता झाला । नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत । सावित्रीनें का प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे । मनीं निश्चय जो केला ॥
आरती वडराजा ॥1॥
पद 2
दयावंत यमदूजा । सत्यवंत ही सावित्री ॥
भावे करीन मी पूजा । आरती वडराजा ॥ ध्रु ॥
ज्येष्ठामास त्रयोदशी । करिती पूजन वडाशीं ॥
त्रिरात्र व्रत करूनीया । जिंकी तूं सत्यवंताशी ।
आरती वडराजा ॥2॥
पद 3
स्वर्गावरी जाऊनियां । अग्निखांब कचळीला ॥
धर्मराजा उचकला. हत्या घालील जीवाला ।
येई ग पतिव्रते ॥ पती नेई गे आपुला ॥
आरती वडराजा ॥3॥
पद 4
जाऊनियां यमापाशीं । मागतसे आपुला पती ॥
चारी वर देऊनियां । दयावंता द्यावा पती ॥
आरती वडराजा ॥4॥
पद 5
पतिव्रते तुझी कीर्ति । ऐकुनी ज्या नारी ॥
तुझें व्रतें आचरती । तुझी भुवनें पावती ॥
आरती वडराजा ॥5॥
पद 6
पतिव्रते तुझी स्तुती । त्रिभुवनी ज्या करिती ॥
स्वर्गीं पुष्पवृष्टी । करुनियां आणिलासी आपुला पती ।
अभय देऊनियां । पतिव्रते तारी त्यासी ॥6॥
स्रोत 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS source decoded to Devanagari and round-trip validated against the site transliterator.
अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.