तुळशीची आरती
आकार
मांडणी
जय देवी जय देवी जय तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ॥ ध्रु ॥
ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थें शाखा परिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥1॥
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी ।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ॥
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ॥2॥
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥3॥
पद 1
जय देवी जय देवी जय तुळसी ।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळिसी ॥ ध्रु ॥
ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थें शाखा परिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारीं ॥1॥
पद 2
शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी ।
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी ॥
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीं ॥2॥
पद 3
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥3॥
स्रोत 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS source decoded to Devanagari and round-trip validated against the site transliterator.
अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.