श्री शनिदेवाची आरती
आकार
मांडणी
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु ॥
सूर्यसूता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥
एक मुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥1॥
नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ॥
ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ॥2॥
विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियलें त्यासी ॥3॥
शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ॥
साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ॥4॥
प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ॥
नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला ॥5॥
ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ॥
कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ॥6॥
दोन्ही कर जोडूनियां । रखमां लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मागे । उदयकाळ सौख्य दावीं ॥7॥
पद 1
जय जय श्रीशनिदेवा । पद्मकर शिरीं ठेवा ॥
आरती ओवाळितों । मनोभावें करूनी सेवा ॥ ध्रु ॥
सूर्यसूता शनिमूर्ती । तुझी अगाध कीर्ती ॥
एक मुखें काय वर्णूं । शेषा न चले स्फूर्ती ॥1॥
पद 2
नवग्रहामाजीं श्रेष्ठ । पराक्रम थोर तुझा ॥
ज्यावरी कृपा करिसी । होय रंकाचा राजा ॥2॥
पद 3
विक्रमासारिखा हो । शककर्ता पुण्यराशी ॥
गर्व धरितां शिक्षा केली । बहु छळियलें त्यासी ॥3॥
पद 4
शंकराच्या वरदानें । गर्व रावणें केला ॥
साडेसाती येतां त्यासी । समूळ नाशासी नेला ॥4॥
पद 5
प्रत्यक्ष गुरुनाथा । चमत्कार दावियेला ॥
नेऊनी शूलापाशी । पुन्हा सन्मान केला ॥5॥
पद 6
ऐसे गुण किती गाऊं । धणी न पुरे गातां ॥
कृपा करी दीनावरी । महाराजा समर्था ॥6॥
पद 7
दोन्ही कर जोडूनियां । रखमां लीन सदा पायीं ॥
प्रसाद हाचि मागे । उदयकाळ सौख्य दावीं ॥7॥
स्रोत 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS source decoded to Devanagari and round-trip validated against the site transliterator.
अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.