श्री खंडोबाची आरती
आकार
मांडणी
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्लां मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥1॥
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ ध्रु ॥
सुरवर संवर वर दे मजलागी देवा ।
नाना नामे गाईन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ जय ॥2॥
रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।
तो हा मल्लंतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णिला ।
रामी रामदासा जिवलग भेडला ॥ जय ॥3॥
पद 1
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥
मणिमल्लां मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥1॥
पद 2
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारीं दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ ध्रु ॥
पद 3
सुरवर संवर वर दे मजलागी देवा ।
नाना नामे गाईन ही तुमची सेवा ॥
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ जय ॥2॥
पद 4
रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।
तो हा मल्लंतक अवतार झाला ॥
यालागीं आवडे भाव वर्णिला ।
रामी रामदासा जिवलग भेडला ॥ जय ॥3॥
स्रोत 1
- sanskritdocuments.org — Marathi Arati Collection — marathi/aaratii.htm
ITRANS source decoded to Devanagari and round-trip validated against the site transliterator.
अर्थ वेद पथ संपादकीय संघाने संकलित व संपादित केले आहेत, आणि साहित्याचे टप्प्याटप्प्याने पुनरावलोकन सुरू आहे.